चिंता वाढली खतांची टंचाई भासणार?

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
मुंबई
India fertilizer shortage मध्य पूर्वेतील सध्या सुरू असलेला संघर्ष आता भारताच्या खत उद्योगावरही परिणाम करत आहे. ‘क्रिसिल रेटिंग्स’च्या ताज्या अहवालानुसार, पुरवठा साखळीतील तूट आणि अडथळ्यांमुळे देशातील युरिया आणि मिश्र खतांच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी घट होऊ शकते. ही परिस्थिती खरीप हंगामाच्या तोंडावर जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
 

India fertilizer shortage, urea production decline, CRISIL Ratings report  
एलएनजी (द्रवरूप नैसर्गिक वायू) आणि अमोनिया या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. जर ही अडचण पुढील तीन महिन्यांपर्यंत सुरू राहिली, तर देशांतर्गत खत उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीमुळे उत्पादन कमी होण्यासोबतच उद्योगाच्या आर्थिक गणितावरही ताण येईल.
भारताचा खत उद्योग मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. देशातील सुमारे २० टक्के युरिया आणि जवळपास एकतृतीयांश मिश्र खतांची गरज आयातीतून भागवली जाते. युरियासाठी लागणारा नैसर्गिक वायू खर्चाचा सुमारे ८० टक्के हिस्सा व्यापतो, तर मिश्र खतांसाठी अमोनिया व फॉस्फरिक अॅसिडसारख्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. देशांतर्गत साठे मर्यादित असल्यामुळे आयातीवर अवलंबित्व अधिक आहे.मध्य पूर्वेतील अस्थिरतेमुळे कच्च्या मालाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम खत उत्पादक कंपन्यांच्या खेळत्या भांडवलावर होईल. खर्च वाढल्यास कंपन्यांच्या नफ्यात घट होऊ शकते, विशेषतः युरिया उत्पादकांसाठी या परिस्थितीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
सरकारसाठीही India fertilizer shortage या संकटाचा परिणाम होणार आहे. खत अनुदानावर होणारा खर्च सुमारे २०,००० ते २५,००० कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता असून, उद्योगाला दिलासा देण्यासाठी अतिरिक्त अनुदानाची गरज भासू शकते.अहवालात असेही नमूद आहे की, सध्या देशात सुमारे तीन महिन्यांचा खत साठा उपलब्ध आहे, तसेच पर्यायी देशांकडून आयात वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युरिया उत्पादकांसाठी ७० टक्के गॅस राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्यामुळे उत्पादनावर होणारा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो.एकूणच, जागतिक घडामोडींचा भारतीय शेती आणि खत उद्योगावर थेट परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामातील खत उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या अडचणी पुढील काही महिन्यांत या पुरवठा साखळीवर अवलंबून राहतील.