‘कौन बनेगा करोडपती’ची स्पर्धक निघाली घोटाळेबाज

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
ग्वाल्हेर,
Kaun Banega Crorepati' contestant मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथून एका महिला तहसीलदाराला अडीच कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही तहसीलदार प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झालेली असून, तिला या कार्यक्रमामुळे राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बडोदा तहसीलमध्ये २०२१ मध्ये झालेल्या कथित पूर मदत घोटाळ्यात सहभाग असल्याच्या संशयावरअमृता सिंह तोमर यांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना शिवपुरी तुरुंगात ठेवण्यात आले आहे. 
 

Kaun Banega Crorepati 
 
 
याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये स्पर्धक म्हणून अमृता सिंह तोमर यांनी ५० लाख रुपये जिंकले होते. याच वेळी, मिर्झापूर जिल्ह्यातील एका ज्युनियर इंजिनिअरला लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाच्या बाणसागर प्रकल्पात काम करत असलेल्या मुसाफिर सिंग यादव यांनी एका कंत्राटदाराच्या कामाचे बिल मंजूर करण्याच्या बदल्यात १ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली ग्रामीण कोतवाली परिसरातून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना अटक केली. आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.