सरकारी पोर्टल्सचा वापर करून फसवणूक

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
मध्य प्रदेश
Madhya Pradesh extortion racket मध्य प्रदेशात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमागील एक मोठे आणि संघटित रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, कुख्यात गुंड लॉरेंस बिश्नोई याच्या टोळीशी संबंधित ऑपरेटिव्ह सरकारी पोर्टल्स आणि सोशल मीडियाचा वापर करून श्रीमंत व्यावसायिकांना लक्ष्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस मुख्यालयाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.
 

Madhya Pradesh extortion racket, Khargone crime news, Lawrence Bishnoi gang 
अशोकनगर, इंदौर, खरगोन आणि भोपाल या भागांमध्ये अलीकडच्या काळात रंगदारी मागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक व्यावसायिकांना धमकीचे फोन करून कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. अशोकनगर पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक करून तपासात महत्त्वाचे धागेदोरे हाती घेतले आहेत.संबंधित टोळी प्रथम जीएसटी आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (रेरा) सारख्या सरकारी पोर्टल्सवरून व्यावसायिकांची आर्थिक स्थिती, प्रकल्पांची माहिती आणि उलाढाल यांचा अभ्यास करते. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत सविस्तर माहिती गोळा करून त्यांना धमकावले जाते. या प्रक्रियेमुळे लक्ष्य केलेल्या व्यक्तीवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
अशोकनगरमध्ये १० कोटी Madhya Pradesh extortion racket  रुपयांच्या रंगदारीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून या नेटवर्कचे स्वरूप समोर आले आहे. या रॅकेटमागे परदेशातून कार्यरत असलेला हॅरी बॉक्सर आणि अजमेर कारागृहात बंद असलेला ऋतिक बॉक्सर यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून राजस्थानातील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना विविध राज्यांत गुन्हेगारी कृत्यांसाठी पाठवत असल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणात १९ वर्षीय मनीष Madhya Pradesh extortion racket  जांगिड या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तो एका व्यावसायिकाच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्याच्या तयारीत होता. इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याचा या टोळीशी संपर्क आला होता आणि त्याला ऑनलाईन पद्धतीने हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्याकडून महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त केले आहेत.या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस मुख्यालयाने एसटीएफच्या देखरेखीखाली एसआयटीची स्थापना केली आहे. या पथकाचे नेतृत्व डीआयजी राहुल कुमार लोढा यांच्याकडे देण्यात आले असून, सर्व प्रकरणांची एकत्रित आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.