चामोर्शी,
friendship-and-cleanliness-campaign : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य कानिफनाथ महाराजांच्या प्रेरणेतून अ. भा. हिंदू संग्राम सेना गडचिरोली, रामानंद संप्रदाय सेवा समिती चामोर्शी व रामानंद संप्रदाय सेवा केंद्र चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यामाने मार्कंडादेव येथे गडकिल्ले संवर्धन स्वच्छता अभियान आणि एक दिवस मैत्रीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला 50 संग्राम सैनिक, तालुक्याचे कॅप्टन, जिल्ह्यातील पदाधिकारी व भक्तगण हजर होते.
सुरुवातीला रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर कवायत, परेड घेण्यात आले. गडकिल्ले संवर्धन स्वच्छतामध्ये श्री मार्कंडेश्वर मंदिराच्या गेटसमोर असलेल्या बागेतील परिसरात स्वच्छता करून परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे सेवा अध्यक्ष प्रकाश कुनघाडकर, उपपीठ पूर्व विदर्भ एक दिवस मैत्रीचे कार्यक्रम प्रमुख अनिल मस्के, श्रीकांत बसेशंकर, लोमेश बुरांडे, प्रमोद दुधबळे, लोमेश भांडेकर, लेफ्टनंट कर्नल यमाजी कावळे, लेफ्टनंट कर्नल महिला प्रीती चिचघरे, चामोर्शी तालुका महिला प्रमुख सुरेखा बुरांडे, राकेश वाघाडे उपस्थित होते. यावेळी प्रमोद दुधबळे यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोमेश भांडेकर यांनी तर आभार प्रिती चिचघरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुरेश चिचघरे, पुरुषोत्तम भांडेकर, सुनिल दुधबळे, गुणाजी कुनघाडकर, ढिवरू चलाख, प्रभाकर कोठारे, वर्षा दुधबळे, संतोष खोबे आदींनी सहकार्य केले.