अमेरिका-इराण तणावात नवा ट्विस्ट; ट्रम्प यांनी हल्ले थांबविले

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
New twist in US-Iran tensions अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पाऊल मागे घेतल्याची महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत ट्रम्प यांनी जाहीर केले की, पुढील दहा दिवस अमेरिकन सैन्य इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर कोणताही हल्ला करणार नाही. इराण सरकारच्या विनंतीनंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 

trusdmo
ट्रम्प यांनी आपल्या पत्रकारपरिषदेत सांगितले की, ऊर्जा प्रकल्पांवर कारवाई करण्याचा निर्णय ६ एप्रिल २०२६ रोजी रात्रीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. त्यांनी असेही नमूद केले की, इराणकडून अधिक वेळ मागितल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, दोन्ही देशांदरम्यान चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी हल्ला टाळण्यात आला असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी आणखी एक दावा करत सांगितले की, इराणने अमेरिकेला एक महत्त्वाची सवलत दिली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दहा टँकरांना मार्ग देण्यात आला असून, त्यापैकी आठ टँकर आधीच निघाले आहेत आणि उर्वरित दोन लवकरच रवाना होणार आहेत. या टँकरवर पाकिस्तानचे ध्वज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.उल्लेखनीय म्हणजे, अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर केलेल्या कारवाईमुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे आणि सध्या या संघर्षाचा २८ वा दिवस सुरू आहे. एका बाजूला चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी दुसऱ्या बाजूला तणाव पूर्णपणे कमी झालेला नाही, त्यामुळे पुढील काही दिवस या परिस्थितीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.