हैदराबाद
Rahul Ramakrishna 'अर्जुन रेड्डी' आणि 'आरआरआर' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधील आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे ओळख मिळवलेल्या तेलुगू अभिनेता राहुल रामकृष्ण यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांच्या भावाने विष प्राशन करून आत्महत्या केली. शेतीमध्ये वापरले जाणारे ' या घटनेनंतर रामकृष्ण यांनी सोशल मीडियावरून तीव्र भावना व्यक्त करत सरकारकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सामाजिक माध्यमांवर त्यांनी पोस्ट शेर केली. पॅराक्वॉटसारखे अत्यंत घातक विष इतक्या सहजपणे उपलब्ध कसे होते, याबाबत त्यांनी आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली. त्यांनी या विषाचा मोठ्या प्रमाणावर आत्महत्येसाठी गैरवापर होत असल्याचेही नमूद केले. आपल्या भावाच्या निधनाने व्यथित झालेल्या अभिनेत्याने अधिकाऱ्यांना यावर कठोर निर्बंध लावण्याचे आवाहन केले आहे.या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना टॅग करत तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली. “हे अत्यंत प्राणघातक Rahul Ramakrishna रसायन आहे. डॉक्टरांकडे अशा प्रकरणांची संख्या वाढत आहे. कृपया यावर बंदी घालून लोकांचे प्राण वाचवा,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.