स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
पिंपरी‑चिंचवड
human trafficking शहरातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने पिंपरीतील ‘रिच फील स्पा’ नामक स्पा सेंटरवर धडक कारवाई करून स्पा नावाखाली चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पीडित महिलांना सुटकारा मिळाला असून पोलिसांनी स्पा ऑपरेटर आणि मॅनेजर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
 

Rich Feel Spa, Pimpri-Chinchwad, prostitution, human trafficking, police raid, 
संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सम्राट चौक परिसरात ‘रिच फील स्पा’ या ठिकाणी अनैतिक व्यवसाय सुरू असून, त्याविषयी मिळालेल्या गोपनीय माहितीवर पोलिसांनी पुढाकार घेत छापे टाकले. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून स्पा मध्ये कोणत्या प्रकारचे प्रकार सुरू आहेत याची खात्री झाल्यानंतर अचानक धाड टाकली. या छापेमारीत देहव्यापार संबंधित असलेल्या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यातून सुटवलं.
पिंपरी‑चिंचवड पोलीस human trafficking आयुक्तालयाने गेल्या काही महिण्यात विविध स्पा आणि हॉटेल्समध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत या प्रकारांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. यात या वर्षात आतापर्यंत सहा स्पा आणि दोन हॉटेल यांच्यावर छापेमारी करून संबंधित ठिकाणांची तपासणी केली असून एकूण २० आरोपींना अटक करण्यात आली आणि १७ महिलांची सुटका करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, या प्रकारातील संशयी २९ ठिकाणांची एक वर्षासाठी बंदी आदेशाद्वारे तोडफोड करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत