संजीवनी येवले यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
नागपूर,
doctorate degree नागपूर येथील प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या, एअर फोर्स असोसिएशनच्या सचिव आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद मातृशक्तीच्या संयोजिका, संजीवनी येवले यांना नेपाल स्थित इंटरनॅशनल गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
 
doctorate degree
 
हा सन्मान त्यांच्या समाजकार्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल म्हणून देण्यात आला. पुरस्कार प्रदान सोहळा वर्धा येथील सेवाग्राम गांधी आश्रम येथे आयोजित करण्यात आला. doctorate degree राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्यभूमीवर पार पडलेल्या या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
सौजन्य: संजीवनी येवले, संपर्क मित्र