भारतात लॉकडाऊनची कोणतीही योजना नाही!

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
There is no lockdown in India देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. कोविड-१९ नंतर पुन्हा लॉकडाऊन लागू होईल असे बोलले जात होते, मात्र आता केंद्र सरकारने यावर स्पष्टपणे अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. केंद्र सरकारने सांगितले की देशात कोणताही लॉकडाऊन लावण्याचा सध्या विचार नाही आणि अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनीही या अफवांना फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या कोविड-१९ सारखी कोणतीही देशव्यापी लॉकडाऊन करण्याची योजना केंद्र सरकारच्या अजेंड्यावर नाही.
 
 

dswe35 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कोविड-१९ बाबत भाषण दिल्यानंतर सोशल मीडियावर लॉकडाऊन लागू होईल असे व्हायरल पोस्ट झाले, ज्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना हरदीप पुरी यांनी सांगितले की, देशात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत आणि केंद्राकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. मंत्री हरदीप पुरी यांनी नागरिकांना शांती राखण्याचे, जबाबदारीने वागण्याचे आणि एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे.