तलावात मासेमारीवरून वाद; चौघांनी केली एकाला मारहाण

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
हिंगणघाट, 
तालुयातील सेलू (मुरपाड) येथे तलावात Fishing dispute: Beating मासेमारी करण्याच्या वादातून चौघांनी एकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक इंदिरा गांधी वार्ड येथील देवराव बावणे (५३) मासेमारी व विक्रीचा व्यवसाय करतात. २६ रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान ते दुचाकीने तलावावर मासेमारीसाठी गेले असता विकी बंचोडबरीया हा तेथे आला.
 
 
marhan
 
Fishing dispute: Beating  त्याने तू माझ्या तलावातील मासे कसे काय पकडतोस, असे म्हणत वाद घातला. यानंतर विकीने भाऊ बंटी बंचोडबरीयासह दोघांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून देवराव बावणे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच देवराव बावणे यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून तुला पोलिस स्टेशनला नेऊन खोट्या चोरीच्या गुन्ह्यात अडकवतो, अशी धमकी दिली. दरम्यान, जखमी बावणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.