शासन शेतकर्‍यांच्या कायम पाठीशी

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही
जिल्हा बँकेने मानले शासनाचे आभार
 
अमरावती, 
राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या विकासासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा विषय निकाली निघाला आहे. केवळ कर्जमाफी करून चालणार नसून शेतकर्‍यांना त्याच्या शेतीवर निर्भर करून उभे करावे लागणार आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या कायम पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही Guardian Minister Chandrashekhar Bawankule पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
 
 
Bawankule
 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे शनिवारी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबद्दल शासनाचे आभार मानन्यात आले व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखेडे, महापौर श्रीचंद तेजवानी, बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू, उपाध्यक्ष अभिजीत ढेपे, सुनील वर्‍हाडे, सुरेखा ठाकरे, नरेशचंद्र ठाकरे यांच्यासह बँकेचे अन्य संचालक उपस्थित होते.
 
 
Guardian Minister Chandrashekhar Bawankule  पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना सर्व भेद बाजूला ठेवून शेतकर्‍यांच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. बँकेने शेतकर्‍यांसाठी विविध ३१ योजना दिल्या आहेत. या योजना परिणामकारकरित्या राबविण्यात येत आहे. सहकार क्षेत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम बँक करीत आहे. शेतकरी जगला तरच देश जगू शकणार असल्याने शेतकर्‍यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. अमरावती जिल्हा बँकेने १४०० कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पैशाचा गैरवापर होणार नाही, यासाठी संचालकांनी कार्य करावे, सहकारी बँका बुडाल्यास सर्वाधिक वेदना शेतकर्‍यांना होतात, याची जाण ठेवावी. त्यामुळे या बँकांचा विकासासाठी पूर्ण सहकार्य आणि मदत करण्यात येईल. शेतकर्‍यांचे हित जोपासण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. प्रामुख्याने शेतामध्ये जाणारे रस्ते अडवल्यास संबंधित शेतकर्‍यांनी पुढील पाच वर्षे कोणतीही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. तसेच २०११ पूर्वी सरकारी जागेवर निवासी अतिक्रमण असलेल्या जागांना पंधराशे फुटांचे पट्टेवाटप करण्यात येणार असून एक हजार रुपयात नोंदणी करण्यात येणार आहे, असे सांगितले. कार्यकारी अधिकारी रमेश बकाळ यांनी आभार मानले.