शेतीच्या मशागतीचे दर गगनाला!

जमिनीचे दर दहा वर्षापूर्वीचेच

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे)
Agricultural tillage prices युद्धामुळे पेट्रोलजन्य पदार्थांचे दर वाढल्याचे निमित्त करीत संयत्रधारकांनी उन्हाळवाहीचे दर भरमसाठ वाढविले. त्यामुळे पिढीजात शेतकर्‍यांची बोबडीच वळली आहे. याउलट शेतांचे ठेका मत्याचे भाव मात्र वाढवून मिळत नाही, अशी ओरड आहे.
 
agri news
Agricultural tillage prices  सततच्या नापिकीने बेजार झालेल्या शेतकर्‍यांना यंदा आखाती युद्धाचे निमित्त करून ट्रॅटर मालकाने वेठीस धरले आहे. एक दशकापूर्वीच्या तुलनेत ही वाढ सरसकट दुप्पटपेक्षा जास्त आहे. याउलट शेतीचे दर मात्र जैसे थे आहेत. कोरडवाहूचा ठेका ८ हजार रुपये एकरी आणि सिंचित जमिनीचा दर १४ हजार रुपये एकरी सरासरी ठरवला जात आहे. त्यातही जमीनधारकास निम्मे पैसे रोख आणि उर्वरित रकम मार्च महिन्यात किंवा सहा महिन्यानंतर दिवाळी झाल्यावर मिळते. परिणामी, शेती व्यवसाय आज खोटा ठरत असल्याची ओरड आहे. Agricultural tillage prices एक दशकापूर्वी २५० रुपये एकरी रोटावेटरचा दर आता १२०० रुपये झाला आहे. नांगरणीला ६०० रुपयावरून १४०० रुपये मागितल्या जात आहे. इतरही कामांच्या दरात भरमसाठ वाढ झाली असल्याचे शेतकरी सुधाकर बारदेव यांनी सांगितले.