आज आर्णीत भव्य शोभायात्रा

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
पंडितजींचे होणार आगमन : शिव महापुराण कथेसाठी प्रशासन सज्ज
६५ एकर जमिनीवर नियोजन : २५०० स्वयंसेवक सेवेत
१२०० पोलिस व अधिकारी तैनात राहणार

राजेश माहेश्वरी
आर्णी, 
Arni: Shiva Mahapuran Katha आर्णीच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय कथावाचक, भागवतभूषण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमृत वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० मार्च ते ५ एप्रिल सिद्धेश्वरनगरीत होणार्‍या या कथेसाठी रविवार, २९ मार्चला पंडित प्रदीप मिश्रा यांचे आगमन होत आहे. त्या निमित्ताने आर्णी येथे रविवारी दुपारी २ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रेत भजनी मंडळ वारकरी मंडळासह सजीव चित्ररथ आणि कलशधारी महिलांची मोठ्या सं‘येत सहभाग राहणार आहे. सर्व शिवभक्तांनी या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
mandap
 
Arni: Shiva Mahapuran Katha कथेसाठी ६५ एकर परिसरात ३ लाख २० हजार फुटांचा कथामंडप उभारण्यात आला आहे. तसेच पार्किंगसाठी कोळवणजवळ ३० एकर जागा आहे. तेथे दिग‘स, माहूर, यवतमाळ येणार्‍यांसाठी पार्किंग व्यवस्था केली आहे. या कथेत सात दिवसांत लाखो भाविकांची उपस्थिती राहणार असल्याने महसूल, नगर परिषद, पोलिस प्रशासनासह स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत शिव महापुराण कथा आणि संध्याकाळी हरिपाठ, कीर्तन व त्यानंतर जगराता श्यामबाबांचे भजन सुंदरकांड सह अन्य धार्मिक कार्यक‘म होणार आहेत. कथा मंडपात २० ते २५ हजार महिला पुरुष भाविक मुक्कामी राहणार आहेत. या कथेला जिल्ह्यासह राज्यातून व जवळच्या राज्यातील भाविक येणार असल्याने दोन्ही वेळा महाप्रसाद, पार्किंग व्यवस्था या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कथेमुळे परिसरातील बेरोजगारांना तात्पुरता रोजगार प्राप्त होणार आहे. बहिरमदेव महापुराण सेवा ट्रस्टने या शिव महापुराण कथेचे आयोजन केले असून अंदाजे २५०० स्वयंसेवक सेवा देणार आहेत.
हजारावर पोलिस यंत्रणा
या शिवमहापुराण कथेसाठी पार्किंग, वाहतूक व सुरक्षेसाठी आर्णी पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. आम्ही पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांची बंदोबस्तासाठी मागणी केली आहे. ५० पोलिस अधिकारी ११०० पेक्षा पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त राहू शकतो.
नीलेश सुरडकर
पोलिस ठाणेदार, आर्णी
नगर परिषद सज्ज
शिवमहापुराण कथेला लाखो भाविक येणार असल्याने नगर परिषदेतर्फे कथास्थळी मोबाईल टॉयलेट, अग्निशमन व परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद शहरातील हातगाड्यांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी सुरळीत करण्याची कार्यवाही करणार
रवींद्र राऊत
मुख्याधिकारी, आर्णी नगर परिषद