आर्वीत श्रीराम रथयात्रा झाली अर्ध शतकी

शहरातील वातावरण राममय

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
आर्वी
Arvi Shri Ram Rath Yatra श्रीरामाचा जयघोष, भगवेमय झालेले वातावरण, प्रभू श्रीरामाच्या जीवनावर आधारित असलेले चित्ररथ, अशा प्रसन्न भक्तिमय वातावरणात शहरातील विविध भागातून निघालेल्या श्री राम शोभायात्रेने आर्वी शहरातील वातावरण राममय झाले होते. ५१ वर्षाची परंपरा असलेल्या स्थानिक श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीद्वारे स्थानिक विश्रामगृह परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली.
 
shriram 
Arvi Shri Ram Rath Yatra मुख्य रथात असणार्‍या राम सीता लक्ष्मण व हनुमंनाच्या प्रतिमांचे पूजन खा. अमर काळे, आ. दादाराव केचे, नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, उपाध्यक्ष गौरव जाजू यांचे हस्ते करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत पौराणिक कथेवार आधारित देखावे, वारकरी भजन मंडळ, महिला भजन मंडळ, श्रीराम जीवनातील कथेवर आधरित देखावे सादर करण्यात आले होते. या शोभायात्रेत प्रभू राम, लक्ष्मण, सीता व हनुमानाची वेशभूषा बालकांनी केली होती. श्रीराम नवमी मित्रपरिवार कसबा श्रीराम वार्ड यांनी जुने श्रीराम मंदिर माळगण वार्ड कसबा येथून तसेच जनता नगर व हनुमान वार्ड येथून श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली
Arvi Shri Ram Rath Yatra छत्रपती शिवाजी चौक, गांधी चौक, इंदिरा चौक, गुरुनानक धर्मशाळा, विठ्ठल मंदिर, इंदिरा चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, जनता नगर चौक, राम मंदिर कसबा माळगण, मायबाई मंदिर, खडकपुरा या मार्गाने शोभायात्रा मार्गस्थ झाली. आयोजनासाठी आ. सुमित वानखेडे मित्र परिवार, आ दादाराव केचे, डी. के. कन्स्ट्रशन, श्री रामदेव बाबा डेव्हलपर्स, पॅरालम ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, नवदुर्गा उत्सव मंडळ, श्री गणेश उत्सव मंडळ आदींनी सहकार्य केले.