बाबासाहेबांच्या जयंतीला दारू दुकाने बंद ठेवा

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
काँग्रेसची ठाम मागणी
 
अचलपूर, 
BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पृष्ठभूमीवर १४ एप्रिल रोजी अचलपूर तालुक्यातील सर्व मद्यविक्री दुकाने एक दिवसासाठी बंद ठेवण्यात यावीत, अशी ठाम मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. अचलपूर तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह भव्य मिरवणुका आयोजित केल्या जातात.
 
 
daru
 
या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. अशा गर्दीच्या आणि उत्सवी वातावरणात सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे अत्यंत गरजेचे असल्याचे काँग्रेसने निवेदनात स्पष्ट केले आहे. मद्यपानामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता, कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी १४ एप्रिल रोजी सर्व दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti काँग्रेसच्या मते, या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि आंबेडकर जयंती उत्सव शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यास मदत होईल. निवेदन देतेवेळी परवाडा शहराध्यक्ष राहूल गवई, तालुका ग्रामीण अध्यक्ष नामदेव तनपुरे, सेवादल अध्यक्ष सचिदानंद बेलसरे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष राहूल गाठे, विशाल खानझोडे, पृथ्वीराज गजभिये, बाबाराव इंगोले, अमोल कविटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.