मुंबई,
Boman Irani gives advice to Trump पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, बोमन इराणी यांनी आपल्या खास विनोदी शैलीत या विषयावर भाष्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प इराणच्या नागरिकांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांदरम्यान बोमन यांनी हलक्याफुलक्या पद्धतीने टोमणा लगावला. बोमन यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ शेअर करत, इराणी लोक शांततेसाठी चर्चेला तयार असल्याचे विनोदी शैलीत मांडले. या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, चर्चेसाठी स्मृती इराणी, अरुणा इराणी आणि स्वतः त्यांना बोलावण्यात आले असून ते या चर्चेसाठी सज्ज आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण काहीही करण्यास तयार असल्याचेही त्यांनी हसत-खेळत सांगितले. यानंतर त्यांनी आणखी एक विनोदी अट ठेवत म्हटले की, ते अमेरिकेला जाणार नाहीत, उलट ट्रम्प आणि त्यांचे प्रतिनिधी भारतात येऊन मुंबईतील दादर पारसी वसाहतीत भेटावेत. तिथे त्यांना पारंपरिक पदार्थांचा आस्वाद देता येईल, असे सांगत त्यांनी वातावरण हलके केले. तसेच, त्यांनी उपरोधिक शैलीत काही विनोद करत हा संदेश संपवला.