भोंदूबाबा अशोकहह खरातचे पाय खोलात

७० टक्के तक्रारदार केवळ महिला

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
नाशिक,
Complaints of Ashok Kharat भोंदूबाबा अशोक खरातला अटक झाल्याच्या दहा दिवसांनी त्याच्या काळ्या कृत्यांची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि हवाला रॅकेटचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री दोन नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका विवाहित महिलेवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचा आणि एका व्यावसायिकाच्या आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. या नवीन प्रकरणांनंतर अशोक खरातविरोधात आता एकूण दहा गुन्हे नोंदले गेले आहेत. अटकीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्पलाईन नंबरवर मागील पाच दिवसांत तब्बल १०० पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. यातील सुमारे ७० टक्के तक्रारदार महिला आहेत.

Ashok Kharat 
भारतात कमावलेला बेकायदेशीर पैसा परदेशात
या महिलांमध्ये अनेकांनी आपली व्यथा फोनवर सांगितली असून, अशोक खरातच्या अत्याचाराची आणि फसवणुकीची माहिती पोलिसांना दिली आहे. समाजात बदनामी होण्याच्या भीतीमुळे बहुसंख्य महिलांनी लेखी तक्रार दाखल केलेली नाही. मात्र एसआयटीचे अधिकारी त्यांना सुरक्षिततेची हमी देत आहेत. अशोक खरात फक्त लैंगिक शोषण आणि फसवणूकपुरताच मर्यादित नाही. त्याने हवाला रॅकेटमार्फत भारतात कमावलेला बेकायदेशीर पैसा परदेशात पाठवला आहे. दुबईपर्यंत पैशांची देवाण-घेवाण करण्यात आली असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्ह्याचा विस्तार होण्याची शक्यता असून, एसआयटीकडे सबळ पुरावे उपलब्ध आहेत. या प्रकरणामुळे नाशिक आणि आसपासच्या भागात सामाजिक संवेदना संतप्त झाल्या आहेत, तसेच पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची भूमिका अधिक प्रभावी केली आहे.