एकवीरा देवीच्या यात्रेत 'राडा'

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
पुणे,
Ekvira Devi temple मावळ तालुक्यातील कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर येथे चैत्र यात्रेनिमित्त पार पडलेल्या पालखी सोहळ्यानंतर रात्री उशिरा भाविकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस यांनी दोन्ही गटांच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
 

Ekvira Devi temple clash, Karla caves Lonavala incident, Pune Maval taluka fight, 
कल्याण आणि पनवेल येथील कोळीवाड्यातील दोन गटांमध्ये पूर्वीपासूनच वाद सुरू होता. यात्रेचा मुख्य कार्यक्रम आणि पालखी सोहळा शांततेत पार पडल्यानंतर रात्री उशिरा हे दोन्ही गट एकमेकांसमोर आले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला; मात्र काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपस्थित भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
या मारहाणीच्या घटनेनंतर Ekvira Devi temple सामाजिक मध्यमांनवर विविध प्रकारच्या चर्चा आणि अफवा पसरू लागल्या. या पार्श्वभूमीवर श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट आणि पोलिस प्रशासनाने तात्काळ भूमिका स्पष्ट केली. “ही घटना दोन गटांमधील वैयक्तिक व जुन्या वादातून घडली असून तिचा देवीची यात्रा, पालखी सोहळा किंवा देवस्थान व्यवस्थेशी कोणताही संबंध नाही,” असे स्पष्ट करण्यात आले. तसेच भाविकांनी अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला. सध्या गड परिसर व पायथ्याशी शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटांतील संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनेचा अधिक तपास केला जात आहे.