'सोमय्या'चा महिनाभरातील दुसरा विश्वविक्रम
चंद्रपूर,
human-message-of-peace जगभरात शांतीचा संदेश पोहचविण्याच्या उद्देशाने सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशने शनिवार 28 मार्च रोजी सकाळी 10 वाजता 1 हजार 381 विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून जागतिक विश्वविक्रम केला. या संस्थेचा हा महिन्याभरातील दुसरा विश्वविक्रम आहे.
human-message-of-peace जगभरात वाढत चाललेली अस्थिरता, युद्धाची भीती आणि निरपराध लोकांचे होत असलेले हाल पाहता, ‘युद्ध नव्हे, तर शांती हवी’ हा मानवतेचा आवाज अधिक बुलंद करण्याची आज गरज आहे, असा संदेश या मानवी साखळीतून देण्यात आला. सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने जगातील सर्वात मोठे ‘जागतिक शांताता चिन्ह’ मानवी प्रतिक साकारून विश्वशांतीचा संदेश दिला गेला. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम ‘ग्रीनीज बुक’च्या माध्यमातून 180 देशांमध्ये प्रक्षेपित केला गेला. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर यांच्या पुढाकाराने झाला.