रेतीघाट ठेका मराठवाड्याचा : विदर्भाच्या हद्दीतून उपसा

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
महसूल अधिकार्‍यांवर बड्या राजकीय नेत्यांचा दबाव ?
दररोज १५ ते २० वाहनांकडून रात्रंदिवस रेती उपसा

यवतमाळ.
Illegal sand mining मराठवाड्यातील हिमायतनगर तालुक्यातील दिघी रेतीघाटाचे अधिकृत कंत्राट उमरखेड तालुक्यातील एका व्यक्तीच्या नावावर आहे. तरीही स्थानिक कर्मचारी व बड्या महसूल अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने आणि राजकीय नेत्यांच्या दबावात दिघी व्यतिरिक्त उमरखेड हद्दीतील बोरी व चातारी नदीपात्रातून दररोज रात्रंदिवस उत्खनन होत आहे. संबंधित रेती तस्करांविरुद्ध कारवाई करण्यास महसूल प्रशासनाने नांगी टाकल्याचे आहे.
 
 
upasa
 
उमरखेड तालुक्यातील एकाच्या नावावर कागदोपत्री दिघी रेतीघाट असला तरीही तो कंत्राटदार नाममात्रच आहे. त्याचे मराठवाड्यातील दिघीच्या रेती तस्करांशी साटेलोटे आहे. उमरखेड महसूल प्रशासनाची काळजी नको, असे सांगून स्थानिक महसूल कर्मचारी व अधिकारी आणि एका बड्या महसूल अधिकार्‍यावर एका राजकीय नेत्याने दबाव टाकून दिघी रेतीघाटाच्या नावावर चातारी व बोरी मराठवाड्यातील १५ ते २० ट्रॅक्टरवाल्या रेती तस्करांनी रात्रंदिवस उपसा चालविला आहे. एकीकडे बड्या नेत्याचा दबाव असल्यामुळे हे सर्व चालत असल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे मात्र तालुका महसूल प्रशासनातील बडे अधिकारी व कर्मचारी आपली पोळी शेकून घेत असल्याचेही बोलले जात आहे.
 
 
Illegal sand mining या प्रकारामुळे बोरी व चातारी नदीपात्रात होत असलेल्या भयंकर उत्खननामुळे मोठमोठे खड्डे पडून नदीपात्राची अक्षरशः चाळणी होऊन नेत्याच्या दबावात आर्थिक स्वार्थापोटी पर्यावरणाचा र्‍हास होऊन शासनाच्या महसूल तिजोरीला चुना लावल्या जात आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या पात्राची पाहणी करून रेती तस्करीला आळा घालावा, अशी मागणी आहे.

नियमांचे सर्रास उल्लंघन
उमरखेड तालुक्यात लिलाव झालेल्या सातही रेती घाटातून नियमांचे सर्रासपणे होत असल्याच्या तक‘ारी व बातम्यांच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकार्‍यांच्या २३ मार्चच्या दूरध्वनी संदेशावरून उमरखेड तहसीलदार सुरडकर यांनी सातही रेतीघाट पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवावे, असे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा मराठवाड्यातील रेती तस्करांपुढे नांगी टाकण्यामागे राजकीय नेत्याचा दबाव की अर्थकारण, की दोन्हीही असा प्रश्न जनतेला पडला आहे.