क्राइम थ्रिलर....ओटीटीवर ‘काट्टान’ची धूम

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
मुंबई
Kattan ओटीटी प्लॅटफॉर्मवर सातत्याने नवीन कंटेंट रिलीज होत असला तरी सध्या एका डार्क क्राइम थ्रिलर सीरीजची विशेष चर्चा रंगली आहे. काट्टान या नव्या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, थरार आणि सस्पेन्समुळे ‘माइंड-ब्लोइंग’ ठरत असल्याची चर्चा आहे . या मालिकेत विजय सेतुपति यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.ही बहुप्रतिक्षित मालिका २७ मार्च २०२६ रोजी जिओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
 

Kattan OTT series, Kattan crime thriller, 
‘काट्टान’च्या पहिल्या सिझनमध्ये एकूण १० भाग असून, प्रत्येक भागात रहस्य आणि थरार अधिक गडद होत जातो. विशेष म्हणजे ही मालिका तमिळसह तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी आणि बंगाली अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे, ज्यामुळे देशभरातील प्रेक्षकांना ती सहज पाहता येत आहे.
दिग्दर्शक एम. मणिकंदन Kattan  आणि बी. अजितकुमार यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे, तर निर्मिती विजय सेतुपती प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. मालिकेत विजय सेतुपतींसह मिलिंद सोमन, सुदेव नायर, कलैवानी भास्कर, मुथुकुमार, वीजे पार्वती, रिशा जेकब्स मोनिका आणि वडिवेल मुरुगन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.