‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ बंद होणार का?

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
मुंबई
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi टीव्हीवरील चाहत्यांच्या आवडत्या मालिकांपैकी एक क्योंकि सास भी कभी बहू थी 2 संबंधित नुकत्याच पसरलेल्या अफवांवर निर्मात्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये असे वृत्त येत होते की हा शो लवकरच बंद होणार आहे आणि त्याची जागी दुसरी मालिका सुरू होणार आहे . मात्र मेकर्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या सर्व अफवांचे खंडन केले आहे.
 

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 news, 
निर्मात्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ बंद केले जाईल आणि दुसऱ्या शोने त्याची जागा घेतली जाईल. आम्ही स्पष्ट करतो की ही सर्व माहिती चुकीची आहे. आम्ही हा शो बंद करत नाही आणि अजूनपर्यंत कोणतीही एंड डेट निश्चित झालेली नाही." त्यांनी पोस्टमध्ये हे देखील नमूद केले की शो रोज रात्री १०:३० वाजता स्टार प्लस वर आणि ऑनलाईन जिओहॉटस्टार वर पाहता येईल.‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका १७ वर्षांपूर्वी समाप्त झाली होती. इतक्या वर्षांनी परत येत असताना Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi  चाहत्यांमध्ये उत्सुकता खूप आहे. या नवीन सिझनमध्ये स्मृती ईरानी मुख्य पात्र तुलसीच्या भूमिकेत आणि अमर उपाध्याय मिहिरच्या भूमिकेत परत आले आहेत. त्याचबरोबर रोहित सुचांती, तनीषा मेहता, शगुन शर्मा आणि अमन गांधी यांसारख्या नव्या कलाकारांनीही मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.