पूर्व नागपूरमध्ये रामधुन रॅलीची शोभायात्रा

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Lakadganj, Nagpur पूर्व नागपूर राम जन्मोत्सव समितीच्या वतीने लकडगंज येथील रामधुन मार्गावरील काली माता मंदिरापासून भव्य रामधुन रॅलीचे आयोजन करण्यात आले.आकर्षक चित्ररथांनी सजलेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यजमान सुरेश पटेल आणि निकेत अग्रवाल यांनी आपल्या पत्नींसह प्रभू रामाच्या रथाची विधिवत पूजा केली.यानंतर प्रभू श्रीराम, माता जानकी आणि बंधू लक्ष्मण रामरथावर विराजमान झाले. संतांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संत अलकाजी, अजय कामनानी, उज्ज्वल पगारिया, नितीन खरा, गिरीश लिलाडिया, जयप्रकाश गुप्ता, दयाशंकर तिवारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

dhun 
 
 
रॅलीमध्ये तलवारबाजी, लेझीम, स्केटिंग, शिवगर्जना, ढोल-ताशे, शिवतांडव तसेच "हरे राम, हरे कृष्ण" चा जयघोष करण्यात आला. धर्मध्वज, Lakadganj, Nagpurभगवान गणेशाचा रथ आणि १०८ मंगल कलश घेऊन महिलांनी रॅलीत विशेष आकर्षण निर्माण केले. रामनाम जप पुस्तिकेलाही नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.काली माता मंदिर परिसरात भगवान श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरणाने झाली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे पदाधिकारी, महिला, तरुण व नागरिकांनी मोठे योगदान दिले.
सौजन्य:अंशुल जिचकार,संपर्क मित्र