एलपीजी गॅसचा पुरवठा बंद होऊ शकतो

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
मुंबई
Chhagan Bhujbal अमेरिका इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका महाराष्ट्रातील नागरिकांना बसत आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे मोठे एलपीजी संकट निर्माण झाले आहे. एकीकडे केंद्राने एलपीजी गॅसचा मुबलक पुरवठा असल्याचे विधान सातत्याने करण्यात येत आहे, तर दुसरीकडे गॅस वितरकांच्या ऑफिस बाहेर नागरिकांच्या लांबचलांब रांगा पहायला मिळत आहेत. अशामध्ये आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (28 मार्च) दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मोठा भ्रम निर्माण होत आहे.
 

Chhagan Bhujbal  
छगन भुजबळ म्हणाले की, तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी गॅसचा पुरवठा बंद होऊ शकतो,” असे विधान त्यांनी केले. यावेळी म्हणाले की, “मुंबई, नाशिक, पुणे येथे पीएनजी सुरु आहे, तिथे त्यांनी घ्यावे. “देशातील निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुलभपणे कसा करता येईल? यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, याचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीत सर्व राज्यांच्या सचिवांना Chhagan Bhujbal  आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना बोलवण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर , पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी , प्रल्हाद जोशी हे केंद्रीय मंत्री होते.” अशी माहिती त्यांनी दिली.केंद्र सरकारला सांगितले की, पीएनजी गॅस सध्या स्वस्त पडत आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. त्याचा जास्त प्रसार झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या एका पत्रकात तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल, असा उल्लेख होता. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करुन घेतल्या पाहिजेत.” असे विधान त्यांनी यावेळी केले आहे.