मुंबई
Maharashtra heatwave alert मुंबईसह कोकण आणि मराठवाडा भागात उन्हाचा प्रचंड झटका जाणवत असून, शहराच्या सांताक्रूझ हवामान स्थानकावर कमाल तापमान 37.1 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत उष्ण आणि दमट हवामान कायम असून, आज शनिवारसुद्धा ही स्थिती टिकून आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांपेक्षा जास्त गेला असून, परभणी, ब्रह्मपुरी, वर्धा, अमरावती आणि अकोला येथे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेले. सोलापूर आणि वाशिममध्येही पारा 39 अंश आहे. सध्या पर्जन्य ढगांच्या कमतरतेमुळे आणि उष्ण वाऱ्यांच्या गतीमुळे वातावरण अधिक उष्ण राहणार आहे.
विशेष म्हणजे, भारतीय Maharashtra heatwave alert हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये तापमानाच्या सतत वाढीवर लक्ष ठेवले आहे. काही जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्णतेचे प्रमाण नोंदले गेले असून, पुढील काही दिवसांतही उष्णतेत वाढ होण्याचे संकेत आहेत. तसेच, राज्यातील काही भागांमध्ये विजांचा कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, गोदिंया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असून, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला. अकोल्यात गेल्या नऊ दिवसांपासून स्थिर असलेले तापमान अचानक वाढले आणि पारा 41.08 अंश सेल्सिअसवर पोहोचला. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक आजारी पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यावरून मोठा सुकसुकाट जाणवत असून, नागरिक उन्हात घरात राहणे पसंत करत आहेत.