शिवकालीन सुवर्ण ‘होन’चे ऐतिहासिक प्रदर्शनाचे

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
नांदेड
Nanded historical exhibition इतिहासप्रेमींसाठी एक दुर्मिळ संधी उपलब्ध होत असून नांदेडमधील ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्यावर शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ३ ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अस्सल सुवर्ण ‘होन’सह प्राचीन नाणी, शस्त्रे आणि विविध ऐतिहासिक वस्तूंचे दर्शन घडणार आहे.
 

Nanded historical exhibition, Nandgiri Fort event, Shivaji era gold Hon coin, 
या प्रदर्शनाची संकल्पना अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी मांडली असून नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था आणि किल्लेदारांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा परिचय नव्या पिढीला व्हावा आणि नंदगिरी किल्ल्याचे जतन-संवर्धन व्हावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी प्रचलित केलेल्या सुवर्ण ‘होन’ या नाण्याचे विशेष आकर्षण या प्रदर्शनात असणार आहे. अशोकसिंह ठाकूर यांच्या संग्रहातील हा अमूल्य ठेवा ३ एप्रिल रोजी प्रथमच सर्वसामान्यांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. किल्ल्यावर अशा प्रकारचे सुवर्ण नाण्यांचे प्रदर्शन महाराष्ट्रात प्रथमच भरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
याशिवाय, इसवी Nanded historical exhibition सनपूर्व ६०० पासूनच्या दुर्मीळ नाण्यांचा संग्रह, तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांची छायाचित्रे देखील प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. श्री चक्रधर संग्रहालय, निलंगा यांच्या संग्रहातील या वस्तूंमुळे इतिहासाचा समृद्ध पट उलगडणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून नंदगिरी किल्ल्यावर अशा प्रकारची प्रदर्शने भरवली जात असून यंदा प्रथमच सुवर्ण ‘होन’चा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचे प्रदर्शन विशेष ठरणार असून इतिहासप्रेमी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.