पोलिस पाटील हा प्रशासनाचा कणा

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
उत्तमकार्य करणार्‍या पोलिस पाटलांचा सत्कार
 
अमरावती, 
Police Patil ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिस पाटीलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणारा पोलिस पाटील खर्‍या अर्थाने प्रशासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्पोर्ट व वाणिज्य संकुल, नवसारी येथे आमदार राजेश वानखडे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून ’पोलिस पाटील परिषद’त शनिवारी आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी मंत्री प्रवीण पोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, साहेबराव तट्टे, जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
 
police patil
 
पालकमंत्री पुढे म्हणाले, Police Patil  पोलिस पाटीलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकर मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्यात येईल. समस्या शासनस्तरावर मार्गी लावण्यात येईल. उत्कृष्ट कार्य केलेल्या पोलिस पाटलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून सत्कार करण्यात आला. याचवेळी पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आमदार राजेश वानखडे यांचा वाढदिवसानिमित्त पालकमंत्री बावनकुळे यांनी त्यांचा सपत्नीक शुभेच्छा देऊन सत्कार केला. पोलीस पाटील परिषदेला जिल्ह्यातील पोलिस पाटील, प्रशासकीय अधिकारी, पोलिस विभागातील अधिकारी, नागरिक उपस्थित होते.