ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
कळंब, 
Poor management of rural hospital तालुक्यातील हिरडी परिसरात टायर फुटल्याने मजूर घेऊन जाणारी गाडी उलटली. त्या वाहनात चारजणांना दुखापत झाली, तर चारजण गंभीर जखमी झाले. अपघातात गंभीर इजा पोचलेल्या रुग्णांना यवतमाळ येथे न्यायचे होते. परंतु येथील १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर हजर नव्हते व चालकसुद्धा घरी जाऊन झोपला होता. त्यामुळे रुग्णांची वेदना पाहता त्यांना यवतमाळ येथे दाखल करणे अत्यावश्यक होते.
 
 
seva
 
त्यामुळे दुसरी १०८ बाभुळगाववरून येणार होती. परंतु त्याला ४० ते ५० मिनिटे लागणार असल्याचे संबंधित चालकाने सांगितले. कळंब येथील १०८ का बंद आहे, अशी विचारणा येथील केली. मात्र त्यांना कोणत्याही स्वरूपाची माहिती नव्हती. उपस्थित कर्मचारीसुद्धा अतिशय बेपर्वाईने वागताना दिसत होता. त्यामुळे कळंब येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार दिसत असून या मतदारसंघाचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री डॉ. अशोक उईके यांनी या कळंब ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष देऊन येथील आरोग्य यंत्रणेचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा कळंब येथील १०८ रुग्णवाहिकेची स्थिती पाहता ती जनतेच्या नसून कर्मचार्‍यांच्या सेवार्थ आहे, अशी सुद्धा जनतेमध्ये चर्चा आहे. या रुग्णालयाचा प्रभार असणारे अधिकारी हे कळंबमध्ये फक्त सही करण्यापुरतेच येतात. त्यामुळे त्यांचा येथील आरोग्य प्रशासनावर कोणत्याही स्वरूपाचा वचक नाही.
 
 
Poor management of rural hospital  या कारभारामुळे उपस्थित असलेले कर्मचारी सुसाट वागतात. कळंबचे ग्रामीण रुग्णालयच ऑक्सिजनवर असल्याची रुग्ण व नातेवाईकांमध्ये आहे. त्यामुळे या भोंगळ कारभाराला वठणीवर आणणार कोण, असा प्रश्न कळंब तालुक्यात विचारला जात आहे. शेवटी रुग्णांच्या परिजनांचा रोष व प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेतलेली दखल पाहता कळंब येथीलच परंतु अधिकृत चालक नसलेल्या व धावपळ करत आलेल्या चालकाने या प्रभारींच्याच आदेशाने शेवटी १०८ नेच रुग्णांना यवतमाळ येथे या रुग्णालयाला योग्य वठणीवर न आणल्यास येणार्‍या काळात येथे या रुग्णालयाविरोधात असंतोषाचा भडका उडाल्यास ते चुकीचे ठरणार नाही. १०८ रुग्णवाहिका का बंद आहे याची मला माहिती नाही, चौकशी करून सांगतो, असे कळंब ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. उमेश मडावी यांनी सांगितले.
 
 
दारव्ह्यातून कौंडण्यपूर पायी
पालखी सोहळ्याचे प्रस्थान
दारव्हा श्री मुंगसाजी महाराज संत मंदिर, जुने (दारव्हा) द्वारा आयोजित दारव्हा कौंडण्यपूर पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार, २८ मार्चला भगवान श्री मुंगसाजी माऊली मंदिर बारीपुरा येथून झाले. ‘ज्ञानोबा ज्ञानोबा, मुंगसाजी माऊली तुकाराम’ या गजरात रुक्मिणी मातेच्या या सोहळ्यात सर्व मुंगसाजी भक्त सहभागी होऊन दिंडी पताकांसमवेत नाचत गाजत माऊलीचा जागरण ही निघाली. या पालखी सोहळयात अनेक पुरुष, महिला सहभागी झाले होते. दिंडीचालक कैलास बाबाराव निमकर तर वीणेकरी अर्जुन नाना दुधे व अनिल रामभाऊ निमकर आहेत.