वर्धा
Pt. Agnihotri Wardha रामनवमीची सुरुवात त्रेतायुगात भगवान श्रीरामाच्या जन्माच्या स्मरणार्थ इक्ष्वाकू वंशातील राजांनी केली. श्रीरामजन्मानंतर अयोध्येचे राजा दशरथ व इक्ष्वाकू राजवंशातील सदस्यांनी हा उत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. श्रीराम नवमी हा रामनवमी सदाचार अंगीकारण्याचा दिवस असल्याचे मार्गदर्शन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.
Pt. Agnihotri Wardha जय महाकाली शिक्षण संस्थेच्या प्रांगणात रामजन्मोत्सवानिमित्त आयोजित कायऱ्क्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नारद पुराण हे वैष्णव पुराण असून यात विष्णूभक्ती आणि रामोपासना यांचे वर्णन आहे. ते रामनवमीच्या आध्यात्मिक महत्त्वाशी जुळते. सूर्यवंशी राजा बाहू यांचा पुत्र सगर हा जन्मतः विष मिसळलेल्या अन्नामुळे विष असलेले बाळ म्हणून नारद पुराणात वर्णित आहे. विमातेच्या कटकारस्थानाने राजाला विषप्रदूषित भोजन दिले गेले तरी बाळाने ते सहन करून सगर (विषसहित) नाव पावले आणि इक्ष्वाकू वंशाचा पराक्रमी राजा झाला. सगराने अश्वमेध यज्ञ केला. ज्याचे घोडे इंद्राने कपिल मुनींच्या तपोवनात लपवले. सगराचे ६० हजार पुत्रांनी पृथ्वी खोदून पाताळात पोहोचून मुनींना चोर समजून अपमान केला. समाधी भंग झाल्याने क्रोधित कपिल मुनींनी डोळ्यांतून अग्नी प्रकट करून सर्व पुत्रांना भस्म केले. गंगेच्या पाण्याने अवशेष धुऊनच मुक्ती मिळेल असे कपिल मुनी म्हणाले. सगराचा नातू भगीरथाने कठोर तपाने गंगेला पृथ्वीवर आणल्याने पुत्रांची मुक्ती झाली. सगरापासून अंशुमान, दिलीप, भगीरथ (ज्याने गंगेचा अवतरण घडवला) ही साखळी चालली. Pt. Agnihotri Wardha भगीरथापासून ककुत्स्थ, रघू, प्रवृद्ध, शंखण, ययाती, नाभाग, अज, दशरथापर्यंत पोहोचले. दशरथाचे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चार पुत्र. राम मर्यादा पुरुषोत्तम, रावणवध करून रामराज्य स्थापन केले. यामधून इक्ष्वाकू वंशाची धर्म, पराक्रम व भक्तीची साखळी दर्शवते. रामनवमीची सुरुवात त्रेतायुगात भगवान श्रीरामाच्या जन्माच्या स्मरणार्थ इक्ष्वाकू वंशातील राजांनी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.