एसआयआर संदर्भात एमआयएमची तहसील कार्यालयावर धडक

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
तहसीलदारांना निवेदन
 
कारंजा लाड, 
SIR Reference: Statement to Tehsildar शहरात सध्या चर्चेत असलेल्या एसआयआर प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर २८ मार्च रोजी एमआयएमच्या वतीने कारंजा तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद उपाध्यक्ष फिरोज शेकुवाले, सर्व सभापती व नगर परिषद सदस्यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.
 
 
NIVEDAN
 
या प्रक्रियेत नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर प्रतिसाद देताना नायब तहसीलदार बनसोडे व नायब तहसीलदार हरणे यांनी नागरिकांना दिलासा देत, प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला.तसेच त्यांनी स्पष्ट केले की, जर कोणताही बीएलओ आपले काम प्रामाणिकपणे व नियमांनुसार करत नसेल, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गरज भासल्यास संबंधितांविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी बनसोडे यांनी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करत नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. तर हरणे यांनी अपंग व्यक्तींचे प्रमाणपत्र, स्मार्ट कार्ड व केवायसी प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 
 
SIR Reference: Statement to Tehsildar या निवेदनामुळे एसआयआर संदर्भातील नागरिकांमध्ये असलेली संभ्रमाची स्थिती काही प्रमाणात दूर झाली असून प्रशासनाच्या भूमिकेमुळे नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निवेदन देतांना मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.