भरधाव दुचाकी जेसीबीला धडकली

एक ठार, दाेन जखमी

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
bike accident जेसीबीने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागे असलेली भरधाव दुचाकी जेसीबीवर धडकली. या विचित्र अपघातात दुचाकीवरील 17 वर्षीय मुलगी उपचारादरम्यान ठार झाली तर दाेघे बहिण भाऊ गंभीर जखमी झाले. हा अपघात वाडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत झाला. भार्गवी तात्या पवार असे मृत मुलीचे नाव आहे. निखिल घाडगे (23) आणि सुहानी घाडगे (19) अशी जखमी भावंडांची नावे आहेत.

bike  accident  
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, 19 मार्च राेजी सायंकाळी सुमारे 6.45 वाजता भार्गवी ही तिचा मावसभाऊ निखिल घाडगे (23) आणि बहीण सुहानी घाडगे (19) यांच्यासह एमएच-04/एजी-1748 क्रमांकाच्या दुचाकीवरून नागपूर-अमरावती राेडने जात हाेती. दरम्यान, नारायण टर्निंग पाॅईंटजवळ त्यांच्या पुढे असलेल्या जेसीबी क्र. एमएच-40/पी-3286 च्या चालकाने निष्काळजीपणे अचानक ब्रेक लावल्याने वाहन जागीच थांबले. त्यांच्या मागे येणाऱ्या निखिलनेही ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र अंतर कमी असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट जेसीबीच्या मागील भागावर आदळली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील 10 दिवसांपासून जीवन-मरणाशी झुंज देत असलेल्या भार्गवीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित दाेघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाेलिसांनी जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
 
अपघातात दुचाकीस्वार ठार
दुचाकीने भरधाव जात असताना मेट्राेच्या खांबामागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. हा अपघात कामठी राेडवर घडला. कार्तिक राजन्ना अरगुलेवार (58, माेदीपडाव, कामठी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. कार्तिक हे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता दुचाकीने नागपूर-कामठी राेडने घरी जात हाेते.bike accident साईबाबा काॅलाेनीजवळील मेट्राे पिल्लर क्र.2 पी/209 जवळून जात असता, काेणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून फिर्यादीचे भावाचे माेपेडला धडक देऊन पळून गेला. या अपघातात कार्तिक यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कामठी पाेलिसांनी आराेपी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.