चैत्र पौर्णिमेच्या उत्सवासाठी तुळजाभवानी मंदिर २२ तास खुले

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
तुळजापूर
Tuljapur Tulja Bhavani Temple धाराशिवच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली तुळजापूरची तुळजाभवानी माता महाराष्ट्रभरातील भक्तांचे केंद्र ठरते. दरवर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात देवीचा उत्सव भव्य स्वरूपात साजरा होतो. यंदा हा उत्सव ३० मार्च ते ३ एप्रिल दरम्यान उत्साहात साजरा होणार आहे.
 

 Tuljapur Tulja Bhavani Temple festival, 
मंदिर प्रशासनाने भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी मंदिर २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर व्यवस्थापक तसेच तुळजापूर तहसीलदार माया माने यांनी सांगितले की, “चैत्रोत्सवात महाराष्ट्रभरातून भाविक येथे येतात. दर्शनाचा लाभ सर्व भाविकांना मिळावा आणि त्यांचा त्रास होऊ नये, यासाठी मंदिर दीर्घकाळासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा दर्शनासाठी मंदिराचेTuljapur Tulja Bhavani Temple  दरवाजे रोज रात्री १ वाजता उघडले जातील आणि रात्री ११ वाजता बंद केले जातील. फक्त दोन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दर्शन सुरू राहील. तसेच, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बिडकर पायरीमार्गे दर्शन मंडपात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.सध्या तुळजापुरात उन्हाचा कडाका आहे, त्यामुळे मंदिर संस्थानकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. सुवर्णेश्वर गणपती ते महाद्वार चौक आणि संपूर्ण मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे रांगेत उभ्या राहणाऱ्या भक्तांना उन्हाचा त्रास होणार नाही आणि पाण्याची सोय देखील सुनिश्चित करण्यात आली आहे.