नादुरुस्त ट्रेलरवर दुचाकी धडकली

दोन गंभीर, एक किरकोळ

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
देवळी
bike hits faulty trailer Devali नादुरुस्त ट्रेलरवर दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवार २८ रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात यवतमाळ-वर्धा महामार्गावरील सेलसुरा ते रेल्वे क्रॉसिंग दरम्यान घडला.
 
devali news 
bike hits faulty trailer Devali मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. ४० एन २९५० क्रमांकाचा नादुरुस्त ट्रेलर रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, यवतमाळकडून वर्धेकडे येणार्‍या एम. एच. ३२ ए. यु. ०५९६ क्रमांकाच्या दुचाकीने ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली. यात दोन गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला. एकाच दुचाकीवर तिघेजण प्रवास करत असताना चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना तातडीने सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच सावंगी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. वृत्त लिहिस्तोवर अपघातात जखमी झालेल्यांची नावे कळू शकली नाही.
bike hits faulty trailer Devali दरम्यान, महामार्गावर नादुरुस्त वाहने कोणत्याही ठिकाणी उभी केल्यामुळे अशा अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.