घामाचे कलिंगड; पण भाव मात्र पाण्याएवढा!

कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात आशिष धापुडकर

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
आशिष धापुडकर
सेलू
Watermelon farmers Selu तालुयातील कलिंगड उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून, बाजारपेठेत कलिंगडाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून पिकवलेले कलिंगड विक्रीसाठी बाजारात आणले असता, व्यापार्‍यांकडून अत्यल्प दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे.
 
watermelon 
Watermelon farmers Selu बी-बियाणे, खत, औषधे, पाणीपुरवठा आणि मजुरी यासाठी हजारो रुपयांचा खर्च करूनही शेतकर्‍यांच्या हातात काहीच उरत नाही. परिणामी, अनेक शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. तोडणी आणि वाहतुकीचा खर्चसुद्धा परवडत नसल्याने काही ठिकाणी तर कलिंगड शेतातच सडण्याची वेळ आली आहे. आम्ही कलिंगड पिकवतोय की नुकसान? असा सवाल आता शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. काही शेतकर्‍यांनी थेट शेतातच ग्राहकांना कलिंगड विक्री करण्याचा मार्ग स्वीकारला आहे, तर काहींना कमी दरात व्यापार्‍यांच्या दारात उभे राहावे लागत आहे. एकीकडे उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडाची मागणी असतानाही शेतकर्‍यांना योग्य भाव मिळत नसल्याने प्रशासनाच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेतकर्‍यांना हमीभाव किंवा बाजारपेठेतील स्थिरता मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शेतकर्‍यांच्या या व्यथेकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा शेतात सोने पिकवूनही हातात माती, अशीच परिस्थिती कायम राहणार आहे.
 
...चौकट...
Watermelon farmers Selu सेलू येथील कलिंगड उत्पादक शेतकरी अखिल जयस्वाल यांनी आपली व्यथा व्यत करताना सांगितले की, यावर्षी मोठ्या अपेक्षेने कलिंगडची लागवड केली होती. बी-बियाणे, खत, औषध फवारणी, पाणी आणि मजुरी यावर भरपूर खर्च झाला. पण, बाजारात गेल्यावर कलिंगडला मिळणारा भाव खूपच कमी आहे. व्यापारी मनमानी दर सांगतात, त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही. तर संतोष कोटंबकार म्हणाले, आता अशी परिस्थिती झाली आहे की, शेतात उभे कलिंगड पाहूनही समाधान वाटत नाही. उलट चिंता वाढते. काही वेळा तर शेतातच कलिंगड विकावे लागतात. पण, त्यातही फारसा फायदा होत नाही. कर्ज काढून शेती केली आणि आता ते फेडायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने आम्हाला योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा शेतकर्‍यांनी शेती करायची तरी कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.