अमेरिकेत ट्रम्पविरोधात ८० लाख लोकांचा मोर्चा

३३०० ठिकाणी निदर्शने इराण युद्ध, महागाईवरून पदावरून हटवण्याची मागणी

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
वॉशिंग्टन डीसी
march against Trump अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या ङ्कनो किंग्स रॅलीङ्खमध्ये 80 लाख लोकांनी भाग घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण अमेरिकेतील सर्व ५०  राज्यांमध्ये ३३००  पेक्षा जास्त ठिकाणी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
 
america protest 
march against Trump आयोजकांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये झालेल्या मागील नो किंग्स आंदोलनाच्या तुलनेत यावेळी सुमारे १० लाख अधिक लोक सहभागी झाले आणि जवळपास 600 हून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
march against Trump आंदोलन करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, ते ट्रम्प सरकारच्या अनेक धोरणांवर नाराज आहेत. त्यांचा राग विशेषतः इराणसोबत वाढलेला तणाव, कठोर इमिग्रेशन कारवाई आणि वाढत्या महागाईबद्दल आहे. अनेक ठिकाणी लोकांनी ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या विरोधात पोस्टर्स दाखवले आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.
 व्हाईट हाऊस म्हणाले- आंदोलनामुळे लोकांना फरक पडत नाही
march against Trump व्हाईट हाऊसने या आंदोलनांना ’थेरपी सेशन’ असे संबोधत म्हटले की, सामान्य लोकांना याचा फारसा फरक पडत नाही. तर ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, त्यांचे निर्णय देशाला मजबूत करण्यासाठी आहेत. त्यांनी असेही म्हटले की, ते ’राजा’ नाहीत आणि त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.
march against Trump फक्त अमेरिकेतच नाही, तर जगाच्या इतर भागांमध्येही ट्रम्प यांच्याविरोधात नाराजी दिसून आली आहे. पॅरिस, लंडन आणि लिस्बनसारख्या शहरांमध्येही लोकांनी रस्त्यावर उतरून ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने केली आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.