शिवा-अडेगाव मार्गावर पुन्हा अपघात

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
-अपघातांची मालिका सुरूच;
- सतर्कतेमुळे ३०-४० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला
 
बाजारगाव, 
Accidents on Shiva-Adegaon road शिवा-अडेगाव मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच शनिवारी सकाळी सुमारे वाजताच्या सुमारास आणखी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर घाट रोड आगाराची एमएच १४ -८२३८ क्रमांकाची बस अडेगाव येथून प्रवासी व विद्यार्थ्यांना घेऊन बाजारगाव मार्गे नागपूरकडे जात होती. शिवा रोडवरील फन अँड फूड पार्कजवळील वळणावर समोरून येणार्‍या ट्रॅव्हल्स वाहनाशी धडक होण्याची शक्यता निर्माण झाली. अपघात टाळण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या खाली उतरवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
 

apghat
 
सदर ठिकाणी ज्या वळणावरघडली, त्या रस्त्यालगतच फन अँड फूड पार्कची खोल विहीर अगदी जवळ असल्याची बाब समोर आली आहे. बस रस्त्याच्या खाली उतरवताना जर चाकाचा ताबा असता किंवा वाहन घसरले असते, तर बस विहिरीत कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या वेळी बसमध्ये सुमारे ३० ते ४० प्रवासी असल्याने मोठी जीवितहानी असती, अशी भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या मार्गाचे काम सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू झाले असून आजतागायत अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याचे दिसून येते. रस्त्यावरील खड्डे, गिट्टीचे ढीग व अर्धवट सिमेंट रस्ता यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच मार्गावर यापूर्वीही अनेक अपघातांची नोंद असून काही प्रकरणांत जीवितहानीही झाली आहे.
 
 
Accidents on Shiva-Adegaon road  या रस्त्याच्या कामामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मात्र, संबंधितांना नुकसानभरपाई मिळालेली नसल्याची भावना नागरिकांकडून केली जात आहे.
या संदर्भात आय.सी.सी. इन्फ्राटेक प्रायव्हेट कंपनीचे मेनेजर शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.
दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विविध माध्यमांतून या कामाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले असतानाही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दररोज हजारो नागरिक व विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संबंधित ठिकाणी तात्काळ सूचना फलक, दिशादर्शक व इतर सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.