शूटिंगदरम्यान दुर्दैवी मृत्यू; अभिनेता राहुल बनर्जी यांचे निधन

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
कोलकाता,
rahul-banerjee-passes-away : बंगाली चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. लोकप्रिय अभिनेता राहुल बनर्जी यांचे वयाच्या 43 व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते एका टीव्ही मालिकेच्या शूटिंगसाठी ओडिशातील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. शूटिंगदरम्यान ते समुद्रात गेले असताना अचानक अपघात झाला आणि ते पाण्यात बुडाले.
 
 
DEATH
 
घटनेनंतर तात्काळ शोधमोहीम राबवण्यात आली. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण बंगाली चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते एक प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखले जात होते आणि त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
राहुल बनर्जी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले असून, त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते.