बॅनरविरोधात वाद...अमोल मिटकरींचा टोला

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
रायगड
Amol Mitkari रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघांमध्ये पार पडलेल्या सत्कार समारंभाने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला गवसणी घातली आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. समारंभाला खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे तसेच काही पक्षीय नेते उपस्थित होते. मात्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे स्टेजवर लावलेला बॅनर
 

Amol Mitkari tweet, NCP banner controversy 
सदर बॅनरवर सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे फोटो असताना, पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो नसल्याचे आढळले. यावरून पक्षीय वर्तुळात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिस्थितीवर आमदार Amol Mitkari  अमोल मिटकरी यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले, “ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वतःदेव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही.” या ट्वीटमध्ये त्यांनी नाव न घेता सुनिल तटकरे यांना टोला लगावला आहे आणि हॅशटॅग “प्रोटोकॉल” वापरला आहे.राजकीय वर्तुळात या घटनेनंतर चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्या फोटोचा अभाव अनेक कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण करत असून, तटकरे कुटुंबियांविरोधात टीकास्त्र देखील जोर धरत आहेत. काही दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटासह इतर पक्षीय नेत्यांसह सुनील तटकरे निशाण्यावर असल्याचे दिसून येते.राजकारणात पुढील काही दिवसात या वादाचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कार्यक्रमातील बॅनर आणि पक्षीय नेतृत्वाच्या छायाचित्रांच्या निवडीवरुन सुरु झालेला हा वाद पक्षाच्या आगामी धोरणांवरही प्रभाव टाकू शकतो.