चित्रनगरीतून मिळणार वैदर्भीय कलाकारांना व्यासपीठ

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
- आशिष जयस्वाल यांचे प्रतिपादन
- नागपूर चित्रपट महाेत्सवाचे रणदीप हुड्डाच्या उपस्थितीत उद्घाटन

नागपूर, 
वैदर्भीय कलाकारांमध्ये प्रचंड क्षमता आहे. परंतु ती दाखविण्याची संधी त्यांना आजवर मिळत नव्हती. लवकरच विदर्भाच्या मातीत रामटेकजवळ चित्रनगरी तयार हाेत आहे. यामुळे वैदर्भीय कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री (वित्त विभाग) Ashish Jaiswalआशिष जयस्वाल यांनी केले. एक दिवसापूर्वीच त्याचा कार्यादेश आल्याची माहिती त्यांनी दिली.
 
 
ckhit
 
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, भारतीय चित्र साधना आणि नागपूर चलचित्र ाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात आयाेजित नागपूर चित्रपट महाेत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणूून सुप्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा यांची विशेष उपस्थिती हाेती. यासह ज्येष्ठ पत्रकार अनंत विजय, भारतीय चित्र साधनाचे सचिव अतुल गंगवार, राजकारणे मीडिया हाऊसचे अजय राजकारणे व्यासपीठावर उपस्थित हाेते.
 
 
चित्रनगरीला महाकवी कुलगुरू कालिदासांचे नाव दिले जाणार असून त्यांच्या आयुष्यावर राज्य शासनाच्या सहयाेगाने चरित्रपट तयार केला जाणार असल्याची महिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. अभिनेता रणदीप हुड्डा यांनी नागपूर चित्रमहाेत्सवाचे उद्घाटन झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करताना आपली संस्कृती आणि इतिहास चित्रपटातून पुढे यावा. त्यासाठी युवांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
 
 
Ashish Jaiswal अनंत विजय यांनी वेळ अमूल्य आहे असे सांगत महाेत्सवाच्या विस्कळीत नियाेजनाविषयी नाराजी व्यक्त केली. यासाठी त्यांनी गुरुजी गाेळवलकर यांच्या ‘विकसित राष्ट्रासाठी वेळेचा सदुपयाेग आवश्यक आहे’ या विचाराचा दाखला दिला. त्याचबराेबर चित्रपट महाेत्सव अधिकाधिक खालच्या पातळीवर आयाेजित हाेण्याची आवश्यकताही व्यक्त केली. कार्यक्रमाला नागपुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चित्रपटप्रेमी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.