एप्रिलमध्ये 14 दिवस बँका बंद, RBI ची सुट्ट्यांची यादी जाहीर

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
bank-holidays-in-april-2026 : एप्रिल 2026 महिन्यात बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. RBI ने जाहीर केलेल्या सुट्टींच्या यादीप्रमाणे, देशभरातील बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत.
 
 
bank-holidays-in-april-2026
 
या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्या (रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार) तसेच विविध राज्यांतील सण आणि खास प्रसंगांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
एप्रिल महिन्यात रामनवमी, महावीर जयंती, गुड फ्रायडे यांसारख्या महत्त्वाच्या सणांमुळे अनेक राज्यांत बँका बंद राहतील. मात्र, सर्व राज्यांमध्ये सर्व सुट्ट्या लागू नसून, काही सुट्ट्या स्थानिक पातळीवर लागू असतात.
 
दरम्यान, बँका बंद असल्या तरी ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा सुरूच राहणार आहेत. त्यामुळे आवश्यक व्यवहार डिजिटल माध्यमातून करता येतील. ग्राहकांनी अडचणी टाळण्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी आधीच तपासून नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.