विरूद्ध दिशेने येणार्‍या बसची दुचाकीला धडक

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
केळझर शिवारातील घटना, चालक गंभीर
 
 सेलू, 
Bus-bike accident विरूद्ध दिशेने नागपूरकडून-वर्धेकडे येणार्‍या बसने समोरून येणार्‍या दुचाकीला जबर धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवार २९ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास केळझर येथील सुनीता नर्सिंग जवळ घडली. एसटी महामंडळाची नागपूर-वर्धा जाणारी एम. एच. ४९ बी. झेड. ८३५७ क्रमांकाची बस ही वर्धेकडे जात असताना केळझर नजिकच्या सुनीता नर्सिंग कॉलेजजवळ केळझरकडून बुटीबोरीकडे जात असलेल्या एम. एच. ३२ ए. झेड. ६५७३ क्रमांकाच्या दुचाकीस धडक दिली.
 

accdd  
 
Bus-bike accident येथे बस सरळ न नेता बसचालक अमोल राऊत यांनी विरुद्ध दिशेने बस टाकल्याने हा अपघात झाला. यात दुचाकी चालक अलगारस्वामी मुरुगेसन (तामिळनाडु) ह. मु. बोरगाव मेघे याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी घटनास्थळ गाठून जखमीला सेलू रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस पाटील प्रकाश खंडाळे यांनी घटनेची माहिती सेलू पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस उपनिरिक्षक धनंजय पांडे, रामकिसन इप्पर, मयुरी पांचाळ यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.