हनी सिंहच्या कॉन्सर्टमध्ये महिलेचा धुमाकूळ; व्हिडिओ व्हायरल

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
मुंबई,
honey-singhs-concert-viral-video : मुंबईत झालेल्या प्रसिद्ध गायक व रॅपर यो यो हनी सिंग यांच्या कॉन्सर्टदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. या कार्यक्रमातील एका महिला चाहतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
 
honey-singhs-concert-viral-video
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्सर्टचे गेट बंद झाल्यानंतरही एका महिला चाहतीने आत जाण्याचा प्रयत्न केला. ती बंद गेटवर चढण्याचा प्रयत्न करत होती. सुरक्षा रक्षकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ती संतापली आणि त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करू लागली.
 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला असून, कार्यक्रमाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अनेक उपस्थित प्रेक्षकांनी प्रवेशद्वारावर गोंधळ आणि गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा केला आहे.
 
दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत आयोजकांकडून किंवा यो यो हनी सिंग यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या घटनेमुळे मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
 
 
 


सौजन्य: सोशल मीडिया