पाेलिस कर्तव्य मेळावा नागपूरसाठी भूषणावह

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- 69 व्या अखिल भारतीय पाेलीस ड्युटी मीट
 
अनिल कांबळे
नागपूर, 
CM Devendra Fadnavis देशभरातील पाेलिस दलातील अधिकाऱ्यांचा अनुभव, प्रतिभा आणि नवकल्पनेचा महाेत्सव म्हणून ओळखल्या जाण्याèया अखिल भारतीय पाेलिस कर्तव्य मेळाव्याची सुरुवात 69 वर्षांपूर्वी नागपुरातूनच झाली हाेती. आज पुन्हा एकदा हाच कर्तव्य मेळावा आयाेजित करण्याचा मान नागपूरला मिळाला, हे आमच्यासाठी भूषणावह आहे. या कर्तव्य मेळाव्यातून आपापल्या राज्यासह देशाला मजबूत, सशक्त आणि दक्ष बनविण्यासाठी पाेलिसांनी प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पाेलिस मुख्यालयाच्या शिवाजी स्टेडियमवर आयाेजित अखिल भारतीय पाेलिस कर्तव्य मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्याम बर्वे, पाेलिस महासंचालक सदानंद दाते, आयाेजक सीआयडीचे अप्पर महासंचालक सुनील रामानंद आणि आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल उपस्थित हाेते.
 
 
cm
 
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की सध्या पाेलिसांसमाेर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासह सायबर गुन्हेगारी राेकण्याचे माेठे आव्हान आहे. त्यासाठी देशातील अन्य राज्यातील पाेलिसांकडे असलेल्या तंत्रज्ञान वापरण्याबाबत देवानघेवाण हाेणे गरजेचे आहे. एकमेकांच्या अनुभवातून शिकणे आणि गुन्हेगारांवर वरचढ ठरणे गरजेचे आहे. पूर्वी इंग्रजांचे कायदे भारतात लागू हाेते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या प्रयत्नामुळे देशात तीन नवीन कायदे लागू करण्यात आले. पूर्वी कायद्याचा उपयाेग इंग्रजाप्रमाणे राज्य करण्यासाठी हाेत हाेता, मात्र आता नव्या कायद्यातून देशसेवा आणि नागरिकांची सेवा अपेक्षित आहे. सध्या तंत्रज्ञानाधारित पाेलिसींग हाेत आहे. महाराष्ट्रात सर्वात माेठी सायबर लॅब असून त्याचा ायदा राज्याला याेग्यपणे हाेत आहे. स्ट्रीट क्राईम पासून ते सायबर क्राईमपर्यंत पाेलिस आव्हानांना यशस्वीपणे ताेंड देत आहेत. ाॅरेंसिकच्या माध्यमातूप पाेलिस विभाग एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. वेळेवर आराेपपत्र दाखल करणे, लगेच साक्षिदार आणि जबाब नाेंदवणे, पुरावे गाेळा काम करणे यासाठी तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. या कर्तव्य मेळाव्यात मंथन, स्पर्धा हाेणार असून प्रत्येक राज्याला याचा लाभ हाेणार आहे. कार्यक्रमात पाेलिस महासंचालक सदानंद दाते यांनी मेळाव्याचे स्वरुप स्पष्ट केले तर आयुक्त डाॅ. सिंगल यांनी आभार मानले.
 
 
po

पेट्राेलसाठी रांगा नाहीत
पेट्राेल तुटवड्याबाबत काेणीही अफवा पसरवू नये. जेव्हा लाेकांनी रांगा लावल्या हाेत्या, तेव्हाही आम्ही स्पष्ट सांगितले हाेते की, आपल्याकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरीही काही लाेक अफवा पसरवत हाेते. आता अशा अफवा पसरवणाèयांवर आम्ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आता रांगा लागणार नाहीत, असे मला वाटते, असे प्रसारमाध्यमांशी बाेलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 
 
पाच राज्यांमध्ये निवडणुका प्रचार
CM Devendra Fadnavis  पाच राज्यांमध्ये निवडणुका हाेत आहेत. पक्ष जिथे मला पाठवेल, तिथे मी जाईन. आसाम आणि केरळ या दाेन राज्यांमध्ये तरी मी निवडणूक प्रचारासाठी जाणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, या चर्चेवर टिप्पणी करण्याची ही याेग्य वेळ नाही. सुनेत्रा पवार, या पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यांचे याबाबत काय मत आहे, हे त्या स्वतः सांगतील. त्यामुळे या विषयावर टिप्पणी करण्याची माझी काेणतीही भूमिका नाही.

अशाेक खरात प्रकरणात निष्पक्ष चाैकशी सुरु
भाेंदूबाबा अशाेक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांना काय समज देण्यात आली, याबाबत माझ्याकडे सध्या काेणतीही माहिती नाही. या प्रकरणाची निःपक्षपणे चाैकशी सुरू आहे. दरराेज अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही. आवश्यकता असल्यासच आम्ही माहिती घेताे. त्यामुळे या प्रकरणाची चाैकशी सुरू असून, याेग्य वेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल.