आता सिलेंडरची समस्या सुटणार

-94 हजार एलपीजी भारतात येणार -इराणची कोंडी फोडून दोन जहाजं रवाना

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली
cylinder-problem-will-be-solved : इराणने पुकारलेल्या संभाव्य नाकेबंदीच्या धास्तीमध्ये अडकलेले दोन भारतीय LPG जहाजं ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ यशस्वीरित्या पार करून भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजांच्या सुरक्षित प्रवासामुळे देशातील गॅस पुरवठ्यावरील संकट टळण्यास मदत होणार आहे.
 
 
LPG
 
 
बीडब्ल्यू टीवायआर आणि बीडब्ल्यू ईएलएम ही दोन महाकाय जहाजे सुमारे 94,000 टन लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) घेऊन येत आहेत. यापैकी बीडब्ल्यू टीवायआर हे जहाज मुंबईच्या वेशीवर पोहोचले असून 31 मार्चपर्यंत ते बंदरात दाखल होईल. तर, बीडब्ल्यू ईएलएम हे जहाज न्यू मंगळूरच्या दिशेने मार्गस्थ झाले असून 1 एप्रिलपर्यंत ते पोहोचण्याची शक्यता आहे. इराणने केवळ शत्रूत्व नसलेल्या जहाजांनाच या मार्गावरून जाण्याची परवानगी दिली असल्याने, भारतीय प्रशासनाने तेहरानच्या अधिकाèयांशी योग्य समन्वय राखून हा मार्ग मोकळा केला आहे.
 
एलपीजी आयातीवरील संकट आणि भारताची स्थिती
 
 
भारताच्या एकूण एलपीजी वापरापैकी सुमारे 60 टक्के भाग आयातीवर अवलंबून आहे, ज्यातील 90 टक्के आयात केवळ पश्चिम आशियाई देशांतून होते. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हा मार्ग इराणकडून ठप्प केला जाण्याच्या भीतीने भारताने आधीच अमेरिका आणि अर्जेंटिनासारख्या देशांकडून पर्यायी आयात सुरू केली आहे. गेल्या वर्षी भारताने 33.15 दशलक्ष टन एलपीजीचा वापर केला होता. त्यामुळे या महत्त्वाच्या जलमार्गातून जहाजांचे बाहेर पडणे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत कळीचे ठरले आहे.
 
भारतीय खलाशी आणि टँकर्सचा सुरक्षित प्रवास
 
 
केवळ एलपीजी टँकर्सच नव्हे, तर कच्च्या तेलाने भरलेले जहाजही 80,886 टन कच्चे तेल घेऊन नुकतेच मुंद्रा बंदरात दाखल झाले आहे. सध्या पश्चिम पर्शियन आखात क्षेत्रात भारताचा ध्वज असलेली एकूण 18 जहाजे असून त्यावर 485 भारतीय खलाशी कार्यरत आहेत. संघर्ष सुरू झाला तेव्हा या भागात एकूण 28 जहाजे होती, त्यापैकी बहुतांश जहाजे आता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात भारतीय यंत्रणांना यश आले आहे.