शेतकर्‍यांना हवामान तंत्रज्ञान मार्गदर्शन

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
एप्रिलमध्ये विशेष ‘डिजिटल शेतीशाळा’
पोकरा प्रकल्प व पाणी फाऊंडेशनचा उपक‘म

यवतमाळ, 
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन व पाणी फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात 'Digital Farming School' ‘विशेष डिजिटल शेतीशाळा’ उपक‘माचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक‘म ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान’ अभियानाचा मुख्य टप्पा असून, बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये सुधारणा करणे हा याचा मुख्य  उद्देश आहे. तज्ञांमार्फत शेतकर्‍यांना शास्त्रोक्त आणि पीकनिहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन मिळावे हा या ‘डिजिटल शेतीशाळा’चा मुख्य हेतू आहे. या उपक‘मात विभाग, पशुसंवर्धन विभाग, माविम, उमेद आणि आत्मा यांसार‘या विविध संस्थांचा सकि‘य सहभाग असणार आहे.
 
 
seti
 
या उपक‘मांतर्गत प्रत्येक प्रकल्प गावात एका मध्यवर्ती ठिकाणी किमान ४० ते ५० शेतकर्‍यांनी एकत्र येऊन डिजिटल शेतीशाळेत सहभागी व्हावे, तसेच किमान दोन महिला बचतगटांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय गावातील ३० ४० शेतकरी कुटुंबांनी आपल्या घरी ऑनलाइन उपस्थित राहूनही या उपक‘माचा लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या ‘डिजिटल शेतीशाळा’ उपक‘माचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे.
डिजिटल शेतीशाळा वेळापत्रक आणि विषयानुसार
'Digital Farming School' हे प्रशिक्षण यूट्युबच्या माध्यमांतून पाणी फाऊंडेशनच्या अधिकृत संध्याकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. यामध्ये १ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान : बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, आंतरपीक पद्धत व बीजप्रकि‘या, ८ एप्रिल रोजी जैविक निविष्ठा : बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, लिंबोळी अर्क व दशपर्णी अर्क निर्मिती, १५ एप्रिल रोजी कीड व्यवस्थापन : एकात्मिक कीड व्यवस्थापन, पिके, पक्षी थांबे व चिकट सापळे, २२ एप्रिल रोजी भात शेती तंत्रज्ञान : भाताची थेट पेरणी , श्री पद्धत व लावणीसाठी यांत्रिकीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.