आज ईचानागी येथे बारस उत्सव यात्रा

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
५१ क्विंटलचा महाप्रसाद होणार वितरीत
 
वाशीम, 
Echanagi : Baras Utsav Yatra जिल्ह्यातील मंगरुळनाथ तालुक्यातील ईचानागी येथील श्रीक्षेत्र महादेव संस्थान येथे उद्या, मार्च रोजी बारस उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीही महादेव संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादासाठी संस्थानच्या वतीने विशेष तयारी करण्यात येत असून, सकाळी ९ वाजता पासुन महाप्रसाद तयार करण्यासाठी सुरुवात झाली.
 
 
Baras Utsav
 
Echanagi : Baras Utsav Yatra स्वच्छता, सुव्यवस्था आणि भाविकांच्या सोयीसाठी जवळपास १००० महिला-पुरुष स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मोठ्या प्रमाणावर भोजन व्यवस्था, थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय तसेच बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जगभरात गॅसची टंचाई असतांना श्रीक्षेत्र महादेव संस्थान ईचानागी येथील स्वयंसेवकांनी परिस्थिती पुढे हात न टेकता हजारोंच्या संख्येने येणार्‍या भाविकांसाठी पारंपरिक इंधनाचा वापर करून महाप्रसाद तयार करण्यास सुरुवात केली. बारस उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या महाप्रसादामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून गावकर्‍यांसह भाविकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे. परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र महादेव संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
छायाचित्र - महाप्रसाद तयार करताना महिला