कारंजा लाड,
Fraud at ISAF Small Finance Bank मंगरूळनाथ रस्त्यावरील मीरा कॉम्प्लेक्स येथे कार्यरत इसाफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या शाखेत तब्बल ९ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी २८ मार्च रोजी दोन कर्मचार्यांविरुद्ध कारंजा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fraud at ISAF Small Finance Bank पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रफुल्ल प्रल्हाद भामरे क्लस्टर हेड, इसाफ स्मॉल फायनान्स बँक लि., यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांच्या कार्यक्षेत्रात वाशीम, अकोट, कारंजा, अकोला व मूर्तीजापूर येथील पाच शाखांचा समावेश असून ते त्या शाखांचे पर्यवेक्षण करतात. कारंजा येथील शाखा व्यवस्थापक निकिता रामेश्वर कपीले यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीममधील कस्टमर सर्व्हिस ऑफिसर किरणकुमार गोपाल चव्हाण रा. खेर्डा, ता. मानोरा व रोहित लक्ष्मण गायकवाड रा. चिंचोली, ता. दिग्रस, जि. यवतमाळ यांनी कामात निष्काळजीपणा करत बँकेची ९.८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. ही घटना १५ सप्टेंबर २०२३ ते १२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे सांगण्यात आले असून, याप्रकरणी २८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ३१८ (४), ३१६ (५), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अल्लापूरकर करीत आहेत.