मुलांसाठी इंटरॲक्टिव्ह रामायण ॲपचे विमोचन

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Interactive Ramayana App लहान मुलांना रामायण सोप्या, मजेदार आणि समजण्यास सुलभ पद्धतीने शिकता यावे, यासाठी अनुकूल चोरघडे यांनी एक छोटासा इंटरॲक्टिव्ह प्लॅटफॉर्म तयार केला आहे. “कथा + क्विझ = मूल्यासह शिक्षण” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम असून मोबाईल आणि वेबवर सहज वापरता येईल असा आहे.
 

app 
 
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी काहीतरी अर्थपूर्ण शिकावे, Interactive Ramayana App  या उद्देशाने हा अभिनव प्रयत्न करण्यात आला आहे. या ॲपचे विमोचन अभय चोरघडे, अंजली चोरघडे तसेच संजय करताळकर यांच्या हस्ते अभ्यंकर नगर येथील हनुमान मंदिरात करण्यात आले.यावेळी हनुमान मंदिर सेवा समितीचे अविनाश गांगरेकर, महेंद्र आकांत, तृप्ती आकांत, नागेश कांगे, सतीश पितळे, अमोल पानसे आदी मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य:अभय चोरघडे,संपर्क मित्र