महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra unseasonal rain महाराष्ट्रातील हवामानात सतत बदल होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात गारपीटासह पाऊस सुरू आहे. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 

Maharashtra unseasonal rain  
भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. लातूर, धाराशिव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि नांदेडमध्ये आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्यापासून राज्यातील हवामान अधिक पोषक पावसासाठी अनुकूल राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
राज्यातील अनेक भागात Maharashtra unseasonal rain पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. वाशिम, धुळे, चंद्रपूर, नागपूर, ब्रह्यपुरीमध्ये काल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले, तर अमरावतीत 41.2 अंश सेल्सिअस उच्चतम तापमान नोंदवले गेले. या अचानक होणाऱ्या तापमान चढउतार आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्यावरही या हवामानाचा गंभीर परिणाम झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे आंब्याची गळ वाढली आहे, आंब्यावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे आणि फवारणी करावी लागत आहे. यावर्षी फक्त रत्नागिरीतच हापूसचे प्रमाण दहा टक्के असून, सकाळी थंडी आणि दुपारी तापमान वाढ यामुळे आंब्यावर किडींचा प्रादुर्भावही झाला आहे. या परिस्थितीत आंब्याचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
 
 
हवामान विभागानुसार, 29, 30 आणि 31 मार्च दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. या हवामान परिस्थितीमुळे आंबा व इतर पिकांवर सतत लक्ष ठेवणे आणि फवारणीसह उपाययोजना करणे गरजेचे आहे.