लाडया बहिणींना ई-केवायसीसाठी ३१ मार्च अखेरची संधी

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
मुदतीत ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन
 
वर्धा, 
March 31 for e-KYC for 'Ladaya Bahini' मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना झालेल्या त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्ती ३१ मार्च पर्यंत करता येणार आहे. दुरुस्तीची ही अंतिम संधी असल्याचे महिलांनी मुदतीत ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे.
 
 
ladakaya
 
March 31 for e-KYC for 'Ladaya Bahini'  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यामध्ये लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी स्वरूपात सरकारी विभाग, शासकीय उपक्रम, महामंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नसणे, तसेच सेवानिवृत्तीनंतर कोणताही सदस्य निवृत्तीवेतन घेत नसणे या अटींबाबत चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले होते. या कारणामुळे अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या. अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया चुकीच्या पर्यायामुळे अपूर्ण राहिली किंवा त्या अपात्र ठरल्या आहेत, त्यांनी ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३१ मार्च ही अंतिम संधी आहे. या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा करण्याची मुभा दिली जाणार नाही. त्यामुळे महिलांनी मुदतीत ई-केवायसी दुरुस्ती करून योजनेचा लाभ निश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे.